Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ krushimantri give whatsapp Number To Farmer For Complaint ] : राज्यांमध्ये मान्सुन पर्जन्यांची सुरुवात दमदार पणे झालेली असून , राज्यातील काही भागांमध्ये पेरणीला सुरुवात झाली असून , शेतकऱ्यांची बियाणे , खते खरेदीकरीता कृषी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे .

अशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लुट तसेच फसवणूक होवू नये , याकरीता राज्याच्या कृषी विभागांकडून विशेष लक्ष दिले जात आहेत . शेतकऱ्यांना जर बियाणांची जास्त किंमतीने विक्री करत असल्यास , अथवा चढ्या भावाने विक्री तसेच बोगस वाण विक्री त्याचबरोबर अनावश्यक खरेदी सक्ती करणे या विरुद्ध तक्रार करण्यासाठी कृषी विभागांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे .

तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी 9822446655 व्हाट्सॲप नंबरवर तक्रार करायची आहे , तक्रार देणाऱ्याची पुर्ण माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत . तक्रार करणाऱ्या शेतकरी / तक्रार करणाऱ्याचे नाव हे गुपित ठेवण्यात येणार आहे .

राज्यांमध्ये कोणत्याही ठिकाणी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीची बियाणे अथवा खत घेण्याची सक्ती करत असल्यास , तसेच बियाणे , खेते अथवा किटक नाशकांच्या जास्त किंमतीने विक्री करत असल्यास त्याचबरोबर अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती जर विक्रेता करत असतील तसेच एखाद्या बोगस बियाणांची विक्री करत असल्यास तसेच शेतकऱ्यांच्या इतर काही अन्य तक्रारी असल्यास , अशा विक्रेत्यांविरुद्ध तक्रारी नोंदवायचे असल्यास …

सदर दुकानाचे नाव , स्थळ , तालुका – जिल्हा या माहितीसी सह संबंधित पुरावा ( पावती , अन्य ) 9822446655 या व्हाट्सॲप नंबरवर पाठवावेत , असे कृषी विभागांकडून सुचित करण्यात आलेले आहेत . सदर तक्रारीवर कृषी विभागांकडून तातडीने दखल घेवून सदर तक्रारीची शहानिशा करुन यावर कार्यवाही करण्यात येईल , अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *