Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Krushi Unnati Yojana ] : कृषी उन्नती योजना अंतर्गत ग्रामबिजोत्पादन योजना राबविणे संदर्भात राज्य शासनांच्या कृषी , पदुम विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कृषी उन्नती योजना अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा ग्रामबिजोत्पादन योजनाच्या अंमलबजावणीसाठी अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता केंद्र हिश्याच्या रुपये 712.52 लाख रुपये व राज्य हिश्याच्या रुपये 475.01 लाख रुपये अशा एकुण रुपये 1187.53 लाख इतक्या निधीच्या कृती आराखड्यास कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 01.11.2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार कृषी उन्नती योजना अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा या केंद्र पुरस्कृत उपयोजना अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राज्यात अनूसूचित जाती प्रवर्गाकरीता राबविण्यासाठी केंद्र हिश्याच्या रुपये 178.130 लाख रुपये व त्यास अनुसरुन राज्य हिश्याचा रुपये 118.753 लाख रुपये असा एकुण रुपये 296.883 लाख रुपये इतका निधी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्यात येत आहेत .
सदर योजना केंद्र शासनाच्या सुचनानुसार व केंद्र शासनाच्या निधी वितरीत करण्याच्या अटी व शर्तीनुसार राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर योजना करीता प्राप्त झालेला निधी हा अनुसुचित जाती संवर्गातील लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात येईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . त्याचबरेाबर केंद्र हिश्यास अनुसरुन समरुप राज्य हिस्सा खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 29.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..