Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Krushi Bajarbhav Update News ] : कापुस , सोयाबीन , हरभरा ,गहुचे बाजारभाव बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारभाव वाढीचा बऱ्याच दिवसांपासुन प्रतिक्षा करीत आहेत , तर हरभरा , गहु , कापुस बाजारभावांमध्ये वाढ होत आहे .
कापसाच्या बाजारभावामधील चढ-उतार कायम असुन , देशांतर्गत बाजारामधील आवक टिकून असल्याने बाजारभाव स्थिर आहे . काल दिनांक 31 मे 2024 रोजीचा बाजारभाव पाहिले असता , अकोट बाजारसमितीमध्ये 7,850/- इतका सर्वाधिक भाव मिळाला आहे , तर इतर बाजारसमितीमध्ये कापसाला 6900/- ते 7300/- इतका सर्वसाधारण भाव मिळत आहे . जे कि मागील आठवड्यापेक्षा 2 टक्यांनी बाजारभावामध्ये वाढ झालेली दिसून येते .
हरभरा गाठतोय सोन्याच्या एक ग्रॅमचा भाव : हरभऱ्याला मागील आठवड्यांमध्ये 6150/- प्रति क्विंटल इतका सरासरी बाजारभाव मिळत होता , आता या आठवड्यांपासुन हरभऱ्याला 6850/- रुपये प्रति क्विंटल ( लातुर बाजार समिती ) , तर वाशिम बाजारसमितीमध्ये हरभऱ्याला 7000/- रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे . यामुळे काही दिवसात हरभरा सोन्याच्या एक ग्रॅमचा भाव गाठण्याची शक्यता आहे .
सोयाबीनची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे , देशांमध्ये सोया पेंडची आयात सुरु असल्याने , सोयाबीनचा बाजारभावामध्ये वाढ होताना दिसून येत नाही , जळकोट बाजारसमितीमध्ये सोयाबीनला 27 मे रोजी 4750/- रुपये प्रति क्विंटर इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला , तर लातुर बाजारसमितीमध्ये 4520/- इतका बाजारभाव मिळत आहे , जे कि मागील आठवड्यापेक्षा 150/- रुपयांची वाढ झालेली आहे . आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे , यामुळे सोयाबीनचे बाजारभाव काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे , शेतकरी सोयाबीनला 5000/- रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तरी , विक्रीस काढतील .
देशात गहुची होणार आयत : देशांमध्ये यंदाच्या वर्षी गहुची आयात करावी लागणार आहे , कारण यंदा रब्बी खंगामामध्ये , गहुचे उत्पादन होवू शकले नाही , यामुळे गहुची तुट भरुन काढण्यासाठी गहुची आयात केली जाणार आहे . सध्या राज्यांमध्ये गहुला सर्वसाधारण 2200/- ते 3150/- रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळत आहे .