Spread the love

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [Kisan Vikas Patra & Mahila Sanman Saving Certificate ] : आपण जर पैशाची गुंतवणुक करुन दाम दुप्पट करु इच्छित असाल , तर पोस्टाच्या किसान विकास पत्र तर महिलांच्या नावाने पोस्ट ऑफीसच्या महिला सन्मान बचत पत्र मध्ये गुंतवणूक करणे अधिक लाभदायक असणार आहेत .

किसान विकास पत्र ( KVP ) : किसान विकास पत्रांमध्ये कोणताही भारतीय व्यक्ती गुंतवणुक करु शकतो , ज्याचे वय हे 18 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असेल . तर एखादा प्रौढ व्यक्ती हा अल्पवयीन अथवा मानसिक आजाराने त्रस्तर असणाऱ्या व्यक्तींच्या वतीने आवेदन सादर करु शकतो . या योजनेतील गुंतवणूकीवर आपणास 7.5 टक्के इतका व्याजदर मिळेल .

मुदत / मिळणारी रक्कम : यामध्ये आपणास 115 महिने गुंतवणुक करावी लागेल , जे कि , एकाच वेळी करावी लागेल , मुदत अंती आपल्या रक्कमेच्या दुप्पट प्राप्त होईल . जर आपण यांमध्ये 100,000/- रुपये गुंतवणुक केल्यास आपणांस 2,00,000/- रुपये मिळतील . म्हणजेच आपल्या गंतवणुकीच्या दुप्पट रक्कम आपणास मुदतीनंतर प्राप्त होईल .

महीलांसाठी खास गुंतवणुक योजना : केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास गुंतवणुक योजना तयार केली आहे , या योजनेचे नाव महिला सन्मान बचत पत्र असे आहे . या बचत योजनांमध्ये महिलांच्या नावाने कमाल 200,000/- रुपये पर्यंत गुंतवणुक करु शकता .

या बचत योजनेची सुरुवात ही सन 2023 पासून करण्यात आलेली आहे . या योजनाची मुदत ही 02 वर्षांची असणार आहे . महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी व त्यांचे कल्याण करणेकामी केंद्र सरकारकडून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे . या योजनेमधील गुंतवणुकीवर आपणांस 7.5 टक्के इतका व्याजरद मिळतो .

म्हणजेच यांमध्ये महिलांच्या नावाने 2,00,000/- रुपये गुंतवणुक केल्यास आपणास 02 वर्षानंतर 2,32,044/- रुपये इतकी रक्कम प्राप्त होईल . म्हणजेच आपणास 32,044/- इतका व्याज मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *