Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त नंतर मिळत असणाऱ्या किमान पेन्शनमध्ये वाढ करणे संदर्भात सरकारकडून एक महत्वपुर्ण प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे . किमान पेन्शन वाढ संदर्भात लोकसभेत एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला होता , या प्रश्नाला केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्वपुर्ण उत्तर दिले आहेत .

किमान पेन्शनमध्ये वाढ करावा यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी सुरु आहे .परंतु केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाकडून किमान पेन्शन 9 हजार रुपये कायम ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे , अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे . भारतीय जनता पार्टीचे बंगळुर मतदार संघाचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी लोकसभेमध्ये , पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनमध्ये वाढ होईल का असा प्रश्न उपस्थित केला होता .

या प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर देत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन 9 हजार रुपये कायम असेल अशी माहिती देण्यात आलेली आहे . वाढत्या महागाई भत्ता मुळे किमान पेन्शन मध्ये वाढ केल्यास पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल असे नुद करण्यात आले असता , केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेमध्ये बुधवारी सांगितले कि , कर्मचाऱ्यांच्या किमान निवृत्तीवेतन आणि कुटुंबनिवृत्तीवेतनांध्ये वाढ करणे संदर्भात केंद्र कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव नाही .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही तर  सेवानिवृत्तीनंतर लाभ घेण्यासाठी , नविन कठोर कायदा (Rules) लागु !

किमान निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनांमध्ये मिळणारी 9,000/- हीच कायम ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *