Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ kharif Season Sowing News ] : खरीप हंगामातील पेरणी संदर्भात तज्ञांकडून महत्वपुर्ण सल्ला देण्यात आलेला आहे . सध्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी जोरदार लावली असून , शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरु झालेली आहे . यांमध्ये तज्ञांकडून पेरणी संदर्भात देण्यात आलेला सल्ला पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

राज्यांमध्ये दिनांक 08 जुन पासुन मान्सुन हळूहळू सर्वत्र ठिकाणी सक्रिय झालेला आहे . तर राज्यातील विदर्भ / मराठवाड्यातील काही उर्वरित भागांमध्ये मान्सुन 15 जुन पर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . राज्यातील विदर्भ भागांमध्ये काही मान्सुन अद्याप पोहोचला नसला तरी अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओल पेरणी योग्य झालेली आहे .

तर या काळांमध्ये खरीप हंगामातील पेरणी करणे योग्य राहील का नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत असेल . तर याबाबत हवामान तज्ञ तसेच शेतीचे अभ्यासक माणिकराव खुळे हे माहिती देताना सांगितले कि , ज्यांच्या जमिनीमध्ये खात्रीची ओल ( जवळपास एक वित ) तसेच सिंचनाची सोय असेल अशाच शेतकऱ्यांनी दिनांक 20 जुन दरम्यान पेरणी करावी अशा प्रकारचा सल्ला हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेला आहे .

दिनांक 15 जुन पर्यंत जो काही पाऊस होईल , त्याच्यामुळे जमिनिमध्ये चांगल्या प्रकारे ओल होईल , तर काही भागांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे , पेरणीनंतर रोप किदान 30 ते 40 दिवस दम धरेल अशा ठिकाणीच 20 जुन दरम्यान पेरणी होवू शकते असा खुलासा हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून करण्यात आलेला आहे .

यामुळे सध्या 20 जुन पर्यंत जे पेरणी करत आहेत , त्यांनी जमिनीतील योग्य ओल लक्षात घेवून तसेच सिंचनाची सोय असल्यासच पेरणीचे धाडस करावेत अशा सल्ला देण्यात आलेला आहे , कारण 15 जुन नंतर कदाचित राज्यांमध्ये पुन्हा जोराचा पाऊस कमी होण्याची शक्यता नाकारु शकत नाही ,याकरीता सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *