Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Karyamulyamapan Ahaval Shasan Nirnay ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दरवर्षीचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपर्ण कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यंतच पुर्ण करणेाबाबत , सुचना देण्यात आलेल्या आहेत . महापारमध्ये राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कार्यमुल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांमध्ये विशेषत : नव्याने महापारमध्ये समाविष्ट केलेल्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी …
तसेच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर कार्यमुल्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपुर्ण कार्यवाही पुर्ण करण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदवाढ देण्यात येत आहेत . सदरची मुदतवाढ ही अंतिम असणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन 2022-23 वर्षाचे गोपनिय अहवाल दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत ..
तसेच महापारमध्ये समाविष्ठ नसलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सन 2022-23 वर्षाचे अहवाल दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम करण्यात यावेत असे सुचित करण्यात आलेले आहेत . सदरची सर्व कार्यवाही केली जाईल , याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी / संस्करण अधिकारी यांची असणार आहे .
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.