Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kamdhenu Dattak Gram Yojana ] : महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभाग मार्फत 2010-11 या आर्थिक वर्षांपासुन राज्यात गाई – म्हशींच्या दुध उत्पादन वाढीकरीता कामधेनू दत्तर ग्राम योजना राबविण्यात येते , या योजनांचे मुख्य उद्देश म्हणजे पशुधनाची गुणवत्ता तसेच दुध उत्पादनात वाढीकरीता पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा आहे .
कामधेनू दत्तक ग्राम योजना : या योजना अंतर्गत पशुंना जंतनाशक औषधे पाजणे तसेच निकृष्ठ चारा सकस करण्याकरीता प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे , गोचिड – गोमाशांचे निमुलन कार्यक्रम आयोजित करणे , दुग्ध स्पर्धांचे आयोजन करणे , रक्तजन तसेच रोगनमुने तपासणी , लसीकरण शिबीर इत्यादी कार्यक्रम दत्तक गावांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येत असते .
या योजना अंतर्गत कार्यक्रमासाठी दुध संकलन केंद्राच्या मार्गावरील तसेच पैदास सक्षम गाई – म्हशींची किमान संख्या ही 300 असणाऱ्या गावांची निवड करुन कार्यक्रम आयोजित करण्यात येते . यांमध्ये पशुवैद्यकीय संस्था असणाऱ्या गावांना प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येत असते . याकरीता पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करुन गावांची निवड करण्यात येते .
ही योजना राबविल्याच्या नंतर दूध उत्पादनाबाबत सर्वेक्षण करण्यात येते , तसेच याबाबत विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते , या योजना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी एका दत्तक गावाकरीता सर्वसाधारण पणे 1.50 लाख रुपये इतका खर्च करण्यात येत असतो .