Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashvashit Pragati Yojana some Changes ] : सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 10 , 20 , 30 वर्षातील कालबद्ध पदोन्नती योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार कमाल मर्यादा हटविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे .
दि.14.02.2024 रोजीच्या झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजना बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 15 हजार अधिकारी / कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षानी कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी देण्यात येते .परंतु कमाल कालबद्ध वेतनश्रेणी ही 5400/- इतक्या ग्रेड पे पेक्षा कमी असणाऱ्यांनाच लागु करण्यात येते .
5400/- रुपये व पेक्षा अधिक ग्रेड पे वेतनाच्या ग्रेड पे असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर आश्वासित प्रगती योजना अंतर्गत कालबद्ध पदोन्नती योजनांचा लाभ प्राप्त होत नव्हता . परंतु कर्मचाऱ्यांच्या वारंवार मागणीमुळे सदर ग्रेड पे ची मर्यादा अखेर हटविण्यात आलेले आहे .
म्हणजेच आता सदर वरील नमुद ग्रेड पे व पेक्षा अधिक ग्रेड पे असणाऱ्यांना देखिल कालबद्ध पदोन्नती योजनांचा लाभ प्राप्त होईल . राज्य शासनांच्या या निर्णयांमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 27 कोटी रुपये इतका आर्थिक बोजा पडणार आहे . या निर्णयामुळे आता सदर योजना अंतर्गत सरसकट सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.