Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ jun month payment / pension shasan paripatrak ] : राज्य कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या माहे जुन महिन्यांचे वेतन तसेच निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 21 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन / निरवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे जुन 2024 या महिन्याचा वेतन व भत्ते , तसेच निवृत्तीवेतन या बाीचा खर्च भागविण्यासाठी संचालनाच्या स्तरावर ..
उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीच्या अधिन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सदर परिपत्रकांमध्ये नमुद लेखाशिर्षाखाली जोडलेल्या तक्यात दर्शविलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.
सदर शासन परिपत्रकानुसार ख्, राज्यातील सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शाळा , सहाय्यक अनुदाने ( वेतन ) , तसेच गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने ( वेतन ) , सर्वसाधरण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान , प्राथमिक शाळांचे निरीक्षण , सहाय्यक अनुदाने ( वेतन ) इ. लेखाशिर्ष खाली एकुण दोन हजार तीनशे बत्तीस कोटी त्रेपन्न लाख सतरा हजार इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.