Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ jun month last weak rain Update news ] : राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून तसेच हवामान तज्ञाकडून वर्तवण्यात आली आहेत . यामुळे पेरणी केलेल्या व पेरणीसाठी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर असणार आहे .

कोकण भागाकडून सह्याद्रीच्या घटमाथावरून मान्सून सावकाश गतीने पुढे सरकत असून ,  राज्यात दिनांक 30 जून पर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील सर्व भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल ,  मान्सूनचा बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर परत एकदा जोरदार आगमन जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होणार आहे .

विदर्भ : विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये दिनांक 20 जून पासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे , तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता कायम टिकून असणार आहे , यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा कायम असणार आहे  .

मुंबई कोकण विभाग : कोकण विभागामध्ये मागील पाच दिवसापासून म्हणजेच दिनांक 18 जून पासून रायगड ,ठाणे, पालघर ,मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर मुंबई शहर, मुंबई उपनगर भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची मोठी शक्यता  वर्तवण्यात आली आहे .

मराठवाडा : मराठवाड्यामध्ये दिनांक 26 जून पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल , तर दिनांक 27 ते 30 जून पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर यामध्ये लातूर , धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये व जिल्हालगतच्या परिसरात आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे .

पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पासूनच जोरदार पावसाला सुरुवात होईल , तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल, परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्ये राज्यातील कोकण , विदर्भ विभागापेक्षा तुलनेने कमी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *