Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee July month payment pension, 5th installment paripatrak ] : कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन , महागाई भत्ता, सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता, इतर भत्ते अदा करणे संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार सन 2024 25 या आर्थिक वर्षातील माहे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्याचबरोबर इतर देय भत्ते अदा करणे करिता आवश्यक निधी खर्च करण्याकरिता संचालक स्तरावर मंजुरी देण्यात येत आहे .
सदरचा निधी हा संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना मंजुरी देण्यात येत आहे . यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी पेन्शनधारक यांचे वेतन / निवृत्ती वेतन वेळेमध्ये अदा होणार आहेत..
सदर शासन परिपत्रकामध्ये , जिल्हा परिषदनिहाय यापूर्वी वितरित करण्यात आलेली तरतूद , सदर ज्ञापनाद्वारे नमूद करण्यात आलेली तरतूद तसेच एकूण तरतूद नमूद करण्यात आली आहे . यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन तसेच सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता ,वाढीव महागाई भत्ता , महागाई भत्ता फरक विहित कालावधीमध्ये अदा होणार आहेत ..
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता .