Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ July month regular payment sudharit instraction paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2024 च्या नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सुचना देणेबाबत , मा.शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक 11.07.2024 रोजीच्या संदर्भिय पत्रानुसार अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय , सोलापुर मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , माहे जुलै 2024 च्या नियमित वेतन देयकासोबत 22020442 , 22020478 , 22020558 , 22020084 , 22020164 , 22023379 या लेखाशिर्षामधील शाळांनी शाळेतील पात्र शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा 5 वा हप्ता त्याचबरोबर अदा न झालेले पहिला , दुयरा , तिसरा , चौथा हप्ता शालार्थ प्रणालीत समाविष्ट करुन वेतन देयक दिनांक 19 जुलै 2024 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता शेवटचा असून , सदर हप्त्यातुन कोणताही कार्यरत व सेवानिवृत्त पात्र कर्मचारी वंचित राहणार नाही , याची सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्याात आलेले आहेत . तसेच पात्र असणाऱ्या कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी सातवा वेतन आयोगातील फरकाचे हप्ते अदा करावयाचे राहील्यास त्यास , संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य व लिपिक जबाबदार राहतील तसेच सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यापासुन वंचित राहील्यास , संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य व लिपिक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच सातवा वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम दुबार अदा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेल आहेत . तसेच पात्र कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग हप्ता अदा करावयाचा एकही कर्मचारी वंचित राहीला नाही , असे प्रमाणपत्र देयकासोबत जोडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक व IFSC कोड बरोबर असल्याची पुर्ण खात्री करुनच देयक फॉरवर्ड करावेत , तसेच माहे जुलै 2024 देयकासोबत सातव्या वेतन आयेागाच्या फरकाचा तक्ता जोडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच माहे जुलै 2024 ची देयके ज्या शाळांनी यापुर्वी फॉरवर्ड केलेली आहेत , अशी देयके रिजेक्ट करण्यात आलेली आहेत . असे नमुद करणयत आलेले आहेत .

या संदर्भात अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय सोलापुर मार्फत दिनांक 12.07.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमााणे पाहु शकता …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *