जुलै महिन्यात असा असणार पाऊसमान ; हवामान खात्यांकडून पावसाबाबत मोकळे स्पष्टीकरण , जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ July month rain update news ] : जुलै महिन्यांमध्ये पाऊसमान कसे असेल , याबबत हवामान खात्यांकडून मोकळे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत . जुन महीन्यांच्या अखेला पावसाने जोराचे एन्ट्री केली होती , तर आता जुलै महिन्यांमध्ये पाऊस नेमका कसा असेल , याबाबत हवामान खात्यांकडून दिलेली माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्यांमध्ये कोकण व पश्चिम महाराष्ट्राचा भाग वगळता सध्या उर्वरित राज्यांमध्ये पावसाचे प्रमाणे कमी आहे , तसेच माहे जुन मध्ये देखिल देशातील सरासरी पावसापेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याचे हवामान खात्यांकडून नमुद करण्यात आलेले आहेत .जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस राज्यभर पडला आहे .

जुलै महिन्यांत असा असणार पाऊसमान : जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा 106 टक्के इतका पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्यांकडून सांगण्यात आले आहेत , तर राज्यातील मध्य महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तसेच विदर्भ, मराठवाडा विभागामध्ये देखिल जुलै महिन्यात चांगला पाउस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

तर जुलै महिन्यांमध्ये राज्यातील तापमान देखिल जास्त राहणार असल्याचे हवामान खात्यांकडून नमुद करण्यात आले आहेत . तर एकंदरित जुलै महिन्यांमध्ये जुन महिन्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे .यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यांत चांगला दिलासा मिळणार आहे .

सरासरीपेक्षा जुलै महिन्यांत 106 पाऊस पडणार असल्याचे , हवामान खात्यांकडून नमुद करण्यात आले आहेत . यामुळे पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरणार आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment