Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ joint insurance amount paid shasan nirnay ] : दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करणेबाबत जलसंपदा विभाग मार्फत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
संलग्न विमा योजना संदर्भात विभागाने अवलंबिलेली सुधारित कार्यपद्धत संदर्भाधिन परिपपत्रकानुसार निश्चित करण्यात आली आहे . या सुधारित कार्यपद्धतीच्या अनुषंगाने प्रस्तावांची पडताळणी करण्यात आलेली आहे .
सन 2023-24 या वित्तीय वर्षाकरीता मागणी क्र. आय – 02 प्रधानशीर्ष 2235 – सामाजिक सुरक्षा व कल्याण , 60 इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम 104 ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निधी ठेव संलग्न विमा योजना नुसार प्रदाने या लेखाशिर्षाखालील मंजुर अनुदानाच्या तरतुदीतून वितरण करण्यास एकुण 08,96,087/- रुपये ( अक्षरी – आठ लक्ष शहान्नव हजार सत्याऐंशी रुपये फक्त ) इतका निधी वितरीत करण्यात येत आहेत .
हे पण वाचा : राज्य शासकीय पगार धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक !
सदरच्या ज्ञापनानुसार उपलब्ध करण्यात आलेला निधी हा कोणत्याही स्थितीमध्ये दिनांक 31.12.2024 पुर्वी खर्च करण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच सदरचा निधी हा उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना वरील नमुद रक्कम अदा करण्याकरीता मंजूरीचे आदेश त्वरील काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
सदरच्या शासन निर्णयांमध्ये विवरण पत्रात कार्यालयाचे नाव , मृत कर्मचाऱ्यांचे संपुर्ण नाव , पदनाम , भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व नाम निर्देशन व्यक्तीचे नाव व तिचे मृत कर्मचाऱ्यांशी नाते व मंजूर रक्कम बाबतचा सविस्तर तपशिल नमुद करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.