Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee jan 2024 Payment GR ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी 2024 पेड इन फेब्रुवारी 2024 महिन्याच्या वेतनाबाबत , आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहेत , या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य स्थितीतील उपलब्ध विदा नविन सेवार्थ प्रणालीत दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पुर्वी अद्ययावत करणेबाबत तसेच कार्यवाही पुर्ण केली नसल्यास माहे नोव्हेंबर 2023देय डिसेंबर 2023 ची वेतन देयके पारित होणार नाहीत अशा सुचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या .
तर शासन परिपत्रक दि.30 नोव्हेंबर 2023 नुसार सदरची कार्यवाही माहे डिसेंबर 2023 देय माहे जानेवारी 2024 ची मासिक वेतन देयके सादर करताना सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमुद प्रमाणपत्रता आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन देयकासोबत , सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या .राज्यातील बहुतांश आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून नविन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक , नियुक्ती दिनांक , सेवानिवृत्ती दिनांक , सेवानिवृत्ती दिनांक , नव्याने निर्माण झालेल्य पदांच्या नोंदी , आधार क्रमांक , पॅन क्रमांक व इतर अनुषंगिक बाबी अद्ययावत केलेल्या नाहीत .
यामुळे नविन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार आता सदर नविन सेवार्थ प्रणालीमध्ये विदा ( Data ) अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सेवार्थ प्रणालीतील सद्य : स्थितीतील उपलब्ध नविन सेवार्थ प्रणालीत दिनांक 31 जानेवारी 2024 पुर्वी अद्ययावत करण्यात यावेत , तसेच सदर कार्यवाही पुर्ण करुन माहे जानेवारी 2024 देय माहे फेब्रुवारी 2024 ची मासिक वेतन देयके सादर करतांना सदर परिपत्रकामध्ये नमुद प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरची कार्यवाही पुर्ण केली नसल्यास माहे जानेवारी 2024 पेड इन माहे फेब्रुवारी 2024 ची मासिक वेतन देयके स्विकारली जाणार नसल्याचे नमदु करण्यात आलेले आहेत . तर मुदवाढ दिलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांची माहे डिसेंबर 2023 देय माहे जानेवारी 2024 ची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालये आणि उप कोषागार कार्यालये येथे स्विकारली जातील .
या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.