जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 परत लागू करण्याचा प्रस्ताव ; सभागृहात मोठा गदारोळ .

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Jammu Kashmir special act 370 ] :  केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा , कलम 370 हटवण्यात आलेला आहे . परंतु जम्मू-काश्मीरमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 परत लागू करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला .

जम्मू काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अब्दुल रहीम राथेर यांची निवड झाली आहे . त्यांच्या निवडीनंतर पीडीपीचे आमदार वाहीद पारा यांनी विधानसभेमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा ठराव मांडला आहे . यामुळे सभागृहात मोठा गदारोळ पाहिला मिळाला . जम्मू कश्मीर मध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने सरकार स्थापन केले आहे .

तर विरोधी पक्षांमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे आमदार वाहिद पारा यांनी विधानसभेत कलम 370 रद्द करण्याचा ठराव विधानसभेत मांडला . यावर त्यांनी बोलताना म्हणाले की “जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यास विरोध आहे.” तर अध्यक्षांची निवड झाल्याच्या नंतर त्यांचे अभिनंदन करून त्यांच्याकडे सदर कलम 370 पुनरस्थापित करण्याची मागणी वाहिद पारा यांच्याकडून करण्यात आली आहे .

या घटनेचा भाजप पक्षाकडून निषेध : या घटनेचा भाजप आमदारांनी विरोध दर्शवला आहे , जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे एकूण 28 आमदार आहेत . यावर भाजपचे आमदार श्यामलाल शर्मा बोलताना सांगितले की , पारा यांनी असा ठराव मांडून सभागृह नियमांचे उल्लंघन केले आहे , त्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे .

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 केंद्र सरकारकडून दिनांक 05 ऑगस्ट 2019 रोजी रद्द करण्यात आलेला आहे . सदर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे , यामुळे असा प्रस्ताव जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत मांडून काही फायदा नसल्याचे , तज्ञांकडून बाब नमूद करण्यात आली आहे .

Leave a Comment