Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ best investment scheme for future ] : वृद्धापकाळात अनेकांना आर्थिक अडचणीचा साजरा करावा लागतो , यामुळे वृद्धापकाळ येण्याच्या अगोदरच पुढील नमुद करण्यात आलेल्या प्रकारच्या शासकीय योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास उतार वयामध्ये मोठ्या आर्थिक फायदा होईल .
अटल पेन्शन योजना ; या पेन्शन योजनेची सुरुवात सर 2015 मध्ये मोदी सरकारने केली आहे , या योजनेच्या माध्यमातून 18 ते 40 वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात .या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेवढी रक्कम गुंतवणूकदार गुंतवणूक करतील , तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते . तर वयाच्या साठ (60 ) वर्षानंतर गुंतवणूक दाराला 1000/- ते 5000/- रुपये पर्यंत पेन्शन लाभ प्राप्त होते .
किसान विकास पत्र (KVP) : किसान विकास पत्रामध्ये 115 महिना करिता गुंतवणूक करावी लागते , ज्यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा लाख रुपये रकमेचे गुंतवणूक करता येते , जी रक्कम 115 पर्यंत दुप्पट होते . जर तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये गुंतवणूक केल्यास , 115 महिन्यानंतर 20 लाख ( दुप्पट) रुपये मिळतील .
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठ नागरिक बचत योजना भारतीय डाक विभाग मध्ये उपलब्ध आहे , या योजनेमध्ये पैशांची मुदत ठेव प्रमाणे गुंतवणूक करता येईल , ज्यामध्ये इतर ठेवीपेक्षा सदर योजनेचे व्याजदर सर्वाधिक आहे . सदर योजनेचे चालू आर्थिक वर्षामध्ये 8.2% इतका व्याजदर आहे .यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सदर योजनेमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते .
पोस्ट ऑफिस मंथली पेन्शन स्कीम : पोस्ट ऑफिस द्वारे प्रतिमहा पेन्शन मिळेल अशा पद्धतीने गुंतवणूक योजना तयार करण्यात आली आहे . या योजनेमध्ये कमीत कमी ती नऊ लाख रुपये तर जास्तीत जास्त 15 लाख रूपये इतकी रक्कम गुंतवणूक करता येईल , त्यावर आपणास 7.5% इतका व्याजदर मिळतो . व व्याजाची रक्कम दरमहा पेन्शन स्वरूपात दिली जाते . या योजनेतून कमीत कमी 5,550/- रूपये तर जास्तीत जास्त 9250/- इतकी रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते .