सध्या पेट्रोल , डिझेलचे वाढते भाव लक्षात घेता , लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत .ज्यामुळे लोकांची पेट्रोल , डिझेलला पैसा खर्च करण्याऐवजी एकदाच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करुन पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत . जाणून घेवूयात टॉप 5 कार पुढीलप्रमाणे ..
1 ) टाटा टियागो ईव्ही : टाटा कंपनीची टाटा टियागो इव्ही कारला मोठ्या प्रमाणात पसंती आहे , कारण ह्या कारची दिल्लीमध्ये किंमत ही 8.68 लाख रुपये पासून ते 11.90 लाख रुपये एक्स शोरुम किंमतीमध्ये मिळत आहे .
2) टाटा नेक्सॉन ईव्ही : टाटा नेक्सॉन ईव्ही या कारला भारतामध्येच नव्हे तर जगांमध्ये सर्वात जास्त पसंती दर्शविण्यात आलेली आहे . कारण नेक्सॉन ह्या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत फाईव्ह रेंटींग देण्यात आलेली आहे .या कारची दिल्लीमध्ये , एक्स शोरुम किंमत 14.50 लाख रुपये ते 18.90 लाख रुपये इतकी आहे .
3) सिट्रोएन ई सी 3 : सिट्रोएन या कंपनीने नुकतेच सिट्रोएन ई सी 3 ही इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे . या कारची दिल्लीत एक्स शोरुम किंमत ही 11.50 ते 12.13 लाख रुपये पर्यंत जाते .
4) महिंद्रा एक्सयूवी : महिंद्रा कंपनीची पहिल्या पसंतीची इलेक्ट्रिक कार म्हणजे महिंद्रा एक्सयुवी 400 होय . या कारची दिल्लीमध्ये एक्स शोरुम किंमत ही 15.90 लाख रुपये ते 18.90 लाख रुपयांमध्ये मिळते .
5) टाटा टिगोर ईव्ही : सिडान कार असणारी टाटा टिगोर ही एकमेव ईव्ह कार आहे , या कारची दिल्लीमध्ये एक्स शोरुम किंमत 12.50 लाख रुपये ते 13.70 लाख रुपये इतकी आहे