Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ India – Maladiv Ralation ] : सध्या भारत – मालदीवचा वाद मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्विप दौऱ्यानंतर मालदिव – भारत वाद अधिकच वाढत चालला आहे , त्यानंतर मालदिवचे पर्यटन विभागांने भारताची जाहीर माफी मागितल्यानंतर हा वाद काहीसा कमी होत चालला होता .
परंतु मालदिवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे वादानंतर चीनच्या दौऱ्यामुळे वाद अधिकच वाढला आहे . शिवाय चीन दौऱ्यानंतर मालदीवने भारताला थेट इशाराच दिलेला आहे . भारताची एक सैन्य तुकडी ही मालदीव संरक्षाणसाठी व तेथील लष्करांना प्रशिक्षणांसाठी अनेक वर्षांपासून तैनात आहे . ही भारताची तुकडी मालदीवच्या सागरी सुरक्षा व आपत्ती निवारण सारख्या कामांमध्ये मदत करते .
आता भारत – मालदीवच्या वादानंतर सदर सैन्य मालदीवमधून हटविण्याचा इशारा दिला आहे , तर सैन्य हटविण्यासाठी दिनांक 15 मार्च ही डेटलाईन मालदिवचे राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून देण्यात आलेली आहे . या सैन्य तुकडीमध्ये भारताचे 88 लष्करी सैन्य आहेत . तर ही सैन्य तुकडी भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक महत्वाची मानली जाते . यामुळे परत भारत – मालदीवचे संबंध चांगले न झाल्यास , चीन या ठिकाणी सैन्य दल पाठवू शकतो . जे कि भारताच्या सुरक्षतेच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरु शकेल .
मोहम्मद मुइज्जू हे भारताचे विरोधक : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे भारताचे विरोधक मानले जाते , त्यांनी इंडिया आऊट या मोहिमेवरुनच निवडणुकींमध्ये विजय मिळविले आहेत . त्यांन्या सांगण्यानुसार आपल्या देशांमध्ये परदेशी सैन्याची उपस्थिती चालणार नाही यामुळे इंडिया आऊट ही मोहिम त्याने सुरु केली आहे .
या वादामुळे मालदीवचे देखिल मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान रोज होते आहेत , आत्तापर्यंत मालदीवचे 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेला आहे . कारण भारत – मालदिव वादांमुळे परदेशी पर्यटक देखिल मालदीव दौऱ्यावर जात नाहीत .