Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [Payment Increament After Transfer ] : बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्याची तरतुद आहे या संदर्भात माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत श्री.सदाशिव उत्तमराव थोरात यांनी माहिती मागिविली असता राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 05.09.2023 रोजी सदर माहितीचा अधिकारास उत्तर सादर दिले आहेत .

सदर माहितीचा अधिकार मध्ये उत्तर देताना नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 07.08.2023 रोजीच्या अर्जांमध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनपांक 03.10.2003 चे महाराष्ट्र राज्य शासनाचे संकेतस्थळावरील शासन आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांस संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत .

सदर आदेशाची अंमलबजावणी अद्याप पर्यंत सुरु आहे काय याबाबत अभिप्राय देण्याची विनंती सदर माहितीचा अधिकारांमध्ये करण्यात आली होती , यावर ग्राम विकास व जलसंधारण विभाग , मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 03.10.2003 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्याप पर्यंत सुरु आहे . या संबंधी दिनांक 03 ऑक्टोंबर 2003 च्या निर्णयानंतर दुसरा कोणताही शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही .या संदर्भात ग्रामविकास विभागांकडून माहितीचा अधिकारांमध्ये दिलेली माहिती / परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

म्हणजेच ग्रामविकास विभागांकडून दिनांक 03.10.2023 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील वर्ग -3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढीव देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश दिनांक .31.10.1989 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांस आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी .

या संदर्भात ग्रामविकास विभागांकडून दिनांक 03.10.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *