Income Tax Save : नोकरदार वर्गांसाठी टॅक्स बचतीचे हे आहेत 10 सर्वोच्चत पर्याय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Tax Saving Best 10 Options ] : आता पुढील महिन्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या मागील वर्षातील उत्पनांचे विवरण द्यावे लागते , अनेक कर्मचाऱ्यांचा वार्षिक उत्पन्न हे करपात्र मध्ये मोडतात . याकरीता कर सुट मिळण्याकरीता सरकारनेच अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . कर बचतीचे सर्वात्तम पर्याय कोणकोणते आहेत . तु पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.आरोग्य विमा : आयकर विभाग सेक्शन 80 सी अंतर्गत आरोग्य विमा प्रिमियम हे सुट देण्यात येते . या सेक्शन नुसार तुम्ही वार्षिक 25,000/- रुपये पर्यंतची रक्कम क्लेम करु शकता ..तर तुमचे आई- वडील यांचे देखिल प्रिमियम भरत असाल आणि आई – वडील यांचे वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक असल्यास तुम्ही 50,000/- रुपये पर्यंतची रक्कम क्लेम करु शकता ..

02.शैक्षणिक कर्ज : यांमध्ये शैक्षणिक कर्ज यावरील व्याजावरील कर हे अमर्याद  पर्यंत लाभ मिळतो , ज्या वर्षा कर्जाची परतफेड सरु करण्यात येते त्या वर्षांपासून कर दाव्यांची सुरुवात करण्यात येते . याचा लाभ तुम्ही कर्ज घेतल्यापासून 7 वर्षापर्यंत घेवू शकता , यांमध्ये एका वेळी दोन मुलांच्या शिक्षणांसाठी घेतलेले कर्ज 10 टक्के व्याजर याप्रमाणे कमाल 50 लाख रुपये ( दोन्ही मुलांकरीता ) कर्ज घेतले असल्यास वार्षिक व्याज 5 लाख रुपये ही व्याजाची संपुर्ण रक्कम करमुक्त असेल .

03.वाहन कर्जावरील सुट : आयकर सेक्शन 80 ईईबी अंतर्गत आपण जर इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली आहे , तर सदर वाहनावरील कर्ज घेतला असल्यास त्याच्या व्याजांवर आपणास 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत करसवलत मिळते .

04.घरभाडे भत्ता ( HRA ) : जर आपल्या पगाराचा भाग म्हणून घरभाडे भत्ता नसल्यास आपण कलम 80 GG अंतर्गत घरभाडे भत्ताचा दावा करु शकता व परंतु आपल्या पगाराचा भाग म्हणून घरभाडे भत्ता भाग असल्यास दावा करु शकणार नाहीत .

05.उपचार देयक : आयकर विभाग कलम 80 DD  अंतर्गत आपल्या स्वत : च्या अथवा आपणावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीच्या विशिष्ठ आजाराच्या उपचारासाठी 40,000/- रुपये पर्यंत सुट दिली जाते . जर ज्येष्ठ नागरिक असल्यास ही मर्यादा 1 लाख रुपये इतकी होते .

06.अपंग असणारी आश्रित व्यक्तींच्या उपचाराकरीता खर्च : आपणावर आश्रीत असणारी अपंग व्यक्तीच्या उपचाराकरीता वार्षीक 75,000/- रुपये पर्यंत तर अपंगात्वाची टक्केवारी ही 80 टक्के व त्यापेक्षा अधिक असल्यास 1.25 लाख रपये इतकी रक्कम वजावटीस पात्र ठरते .

07. NPS ( राष्ट्रीय पेन्शन योजना ) मध्ये गुंतवणुक : आपण जर केंद्र सरकारच्या नविन पेन्शन योजनांमध्ये गुंतवणुक केली असल्यास आपल्याला कलम 80 CCD अंतर्गत 50,000/- रुपये पर्यंतची सुट देण्यात येते .

08.गृहकर्ज यावरील व्याज : आपण जर गृहकर्ज घेतले असल्यास , आपल्याला गृहकर्जाच्या मुद्दल याव्यतिरिक्त करसवलत मिळत असते . आयकर विभाग कलम 24 ब अंतर्गत वार्षिक 2 लाख रुपये पर्यंतचे गृहकर्ज यावरील व्याज करसवतीलस पात्र ठरतो .

09.LIC / EPF /PENSION /PPF : आपण जर एलआयसी , पेन्शन , पीपीएफ , ईपीएफ मध्ये तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र , मुलांचे शिक्षण शुल्क यावरील गुंतवणुक आपणास आयकर विभाग कलम 80 सी अंतर्गत करपात्र ठरतो ..

10.गृहकर्ज ( Home Loan ) : आपण जर गृहकर्ज घेतले असल्यास मुद्दलाची रक्कम ही कलम 80 सी अंतर्गत करसवलतीस पात्र ठरते . सदरची मर्यादा ही 150,000/- रुपये पर्यंत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment