Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee inability Pension Rule ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचारी जर सेवेत काम करण्यास असमर्थत झाल्यास , अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देवून असमर्थता देवून निवृत्ती वेतन देण्यात येते . या संदर्भात असमर्थता / रुग्णता निवृत्ती वेतन नियम 62 , 68 व 80 पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
जर एखादा अधिकारी / कर्मचारी हा शारिरीक अथवा मानसिक रुग्णतेमूळे शासन सेवा करण्यास असमर्थ ठरला असल्यास , वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर सदर कर्मचाऱ्यास नियत वयोमानापुर्वी सेवा निवृत्ती देण्यात येते . अशा प्रसंगी सदर अधिकारी / कर्मचाऱ्यास जे निवृत्ती वेतन देण्यात येते , त्यास असमर्थता निवृत्ती वेतन / रुग्णता निवृत्ती वेतन असे म्हणतात .
परंतु जर रुग्णता / असमर्थता ही त्याच्या असंयमित सवयीमुळे थोडक्यात त्याच्या व्यसनाधिनतेमुळे निर्माण झालेली असल्यास , अशा प्रसंगी रुग्णता / असमर्थता निवृत्ती वेतन लागु करण्यात येत नाहीत . कर्मचारी सेवा करण्यास अपात्र ठरत असेल अशा बाबत प्राधिकृत्त अधिकाऱ्यांकडून वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारावर निर्णय घेण्यात येईल .
बऱ्याच वेळी कर्मचारी हा असमर्थ ठरला तरी इतर पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो , जसे कि एखादा वाहनचालक हा अपघातामुळे वाहन चालविण्यास सक्षम नसला इतर इतर पदांचे कामे शिपाई , लिपिक करु शकत असल्यास , त्या पदावर नियुक्ती देणे शक्य आहे . याबाबत सक्षम अधिकाऱ्यांकडून पडताळणी करुनच इतर पदांची कामे देण्यात येतात . मात्र इतर पदांवरील देखिल नियुक्ती शक्य नसल्यास सेवानिवृत्ती देवून रुग्णता / असमर्थता निवृत्तीवेतन दिले जाते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.