वर्षाच्या सुरुवातीलाच पेन्शन धारकांसाठी महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important relief decision for pensioners at the beginning of the year ] : पेन्शन धारकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे नविन वर्षाच्या सुरुवातीपासुनच पेन्शन बँकेतुन काढणेबाबत महत्वपुर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे .

नेमका नविन सुधारित नियम काय ? : सदर सुधारित नियमानुसार , पेन्शधारकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम काढता येणार आहे . EPFO मार्फत सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये CPPS म्हणजेच सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सेवा  लागु करण्यात आली आहे . सदरची माहिती कामगार मंत्रालयामार्फत दि.03.01.2025 रोजी दिली आहे .

याबाबत ईपीएफओ च्या प्रत्येक विभागीय तसेच प्रादेशिक कार्यालयांनी बँकांशी स्वतंत्रपणे करार करण्यात आला आहे . सदरच्या करारानुसार , पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँक शाखामधून पेन्शनची रक्कम काढता येणार आहे . म्हणजेच ईपीएफओ कार्यालयातुन त्यांच्या पेन्शनची रक्कम काढता येणार आहे .

देशातील सर्वच 112 EPFO कार्यालयांमध्ये सदर केंद्रीकृत असणारी पेन्शन पेमेंट सेवा ( Pension Payment Scheme ) लागु करण्यात आलेली आहे . पेन्शन सुरु करताना आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही , तर सदर पेन्शनची रक्कम ही रिलझ झाल्याच्यानंतर लगेच खात्यात जमा करण्यात येणार आहे .

यामुळे पेन्शनधारकांना भारतभर कोठेही पेन्शनची रक्कम काढता येणार आहे . म्हणजेच पेन्शनधारक हे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी स्थायिक झाले असल्यास , त्यांची बँक अथवा शाखा बदलल्यास Pension Payment Order च्या माध्यमातुन पेन्शन एका कार्यालयातुन दुसऱ्या कार्यालयांत हस्तांतरीत करण्याची आवश्यकता यापुढे भासणार नाही .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment