Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding teachers’ attire ] : शिक्षकांच्या पेहराव संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 15.03.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील , शाळांमधील कार्यरत शिक्षकांनी आपली वेशभूषा कशी असावी , याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . त्यानुसार शिक्षकांनी आपला पेहराव करण्याचे सूचित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शिक्षकांना आपल्या पदास अनुसरुन पेहराव करण्याचे नमुद करण्यात आले असून , यांमध्ये पुरुष शिक्षकांनी शर्ट व ट्राऊझर पॅन्ट , शर्ट इन करुन परिधान करण्याचे निर्देश आहेत , तर गडद रंगाचे चित्र- विचित्र , नक्षीकाम / चित्रे असणारे पेहराव परिधान न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्टचा वापर शाळेमध्ये न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तर महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार / चुडीदार , कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीचा पेहराव करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच परिधान करण्यात आलेला पेहराव हा स्वच्छ व नीटनेटका असेल , याची शिक्षकांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
याशिवाय शाळेमध्ये सर्व शिक्षकांकरीता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा , असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.