Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding sanctioning the first benefit of Asswasit Pragati Yojana issued on 14.01.2025 ] : सातवा वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत महसूल व वन विभागांकडून दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासकीय कर्मचारी / अधिकाऱ्यांना 10 , 20 व 30 वर्षांच्या नियमित सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून लागु करण्यात आली आहे .
तसेच सदर योजनेनुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग – 02 / सह जिल्हा निबंधक वर्ग – 02 संवर्गातील अधिकाऱ्यांना ( गट ब वेतन श्रेणी 9300-34800 ग्रेड पे 4400 ) या पदावर सलग 10 वर्षाची नियमित सेवा पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ ( वेतनश्रेणी 9300-34800 , ग्रेड पे 4400 ) मंजूर करण्यात येत आहे .
तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनच्या लाभामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत व कर्तव्यांमध्ये वाढ होत नसली तरी त्यांना वित्त विभाग , शासन निर्णय दि.02.03.2019 मधील तरतुदीच्या अधिन राहून नियमित पदोन्नतीप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेत वेतन निश्चितीचा लाभ मिळणार आहे .
तसेच प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ देय होणार नाही , व या योजना अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिल्याच्या नंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या वा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला लाभ काढून देण्यात येईल , मात्र दिलेल्या लाभाची वसूली करण्यात येणार नाही . असे नमुद करण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.