Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important changes will be made at the 10th/12th board examination centers from this year ] : या वर्षी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर महत्वपुर्ण बदल होणार आहेत , ज्यामुळे परिक्षेतील गैरप्रकाराला आळा बसणार आहे , सदरचे बदल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

संचालक , पर्यवेक्षक तसेच संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य परीक्षा केंद्रावर : बोर्ड परीक्षेसाठी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहेत , त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक , पर्यवेक्षक या शिवाय परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या परीक्षा केंद्रा व्यतिरिक्त अन्य शाळेतील शिक्षक / कर्मचाऱ्यांमधून करण्यास बोर्डाकडून आदेश देण्यात आलेले आहेत .

राज्यात दहावी / बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सदर महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येत आहेत . तसेच राज्यात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह दिनांक 20 ते 26 जानेवारी आयोजित करण्यात आला आहे .

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे : दहावी / बारावीच्या बोर्डाच्या सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास बोर्डाकडून आदेश देण्यात आल्याने , यंदाच्या परीक्षा ह्या पुर्णपणे कॉपीमुक्त होणार हे निश्चित आहे .

सदरच्या बदलामुळे बोर्ड परीक्षेत होणारे गैरप्रकार यांना आळा बसणार आहे , यामुळे विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *