Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ IMP Shasan nirnay About Pension & Family Pension ] : निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 11 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयांमध्ये सदर निवृत्तीवेतन खाते हाताळणी संदर्भात कार्यपद्धती विशद करण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , ज्या निवृत्ती वेतनधारकांना अथवा निवृत्तीवेतन धारकांना अतिवार्धक्य , स्मृतिनाश , अर्धांगवायू , रुग्णशय्याधिनता अथवा अन्य प्रकारच्या शारीरिक व्याधाी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक तसेच मानसिक दुर्बलता – विकलांगता , अक्षमता इत्यादींमुळे त्यांच्या निवृत्ती वेतन विषयक बँक खात्यांचे व्यवहार व्यक्तीश : हाताळणे शक्य होत नसेल ..
अशा निवृत्तीवेतनधारकांनी उपोद्घातातील वित्त विभागाच्या दिनांक 12 डिसेंबर 2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्राधिकारपत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहेत , त्या वैवाहीक जीवन साथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच वरील नमुद परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्तीवेतनधारकांचे अथवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे वैवाहिक जीवन साथीदार देखिल अशाच प्रकारच्या शारिरीक – मानसिक दुर्बलता – विकंलांगता , अक्षमता इ. मुळे निवृत्ती वेतन विषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवन साथीदार हयातच नसतील अशा निवृत्ती वेतन धारकांना / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतन विषयक बँक खात्यांचे व्यवहार हाताळण्यासाठी …
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विहीत कार्यपद्धती अथवा प्रमस्तिष्क घात , मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्याय अधिनियम 1999 अंतर्गत पालक नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असणाऱ्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 11 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला GR डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE (GR – PDF)
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.