Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ IMP Pustika For Election Duty Employee ] : सध्या लोकसभा निवडणुकास सुरुवात होत आहे , सदर निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया मध्ये समाविष्ठ झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण पुस्तिका निवडणूक आयोगांकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे .
प्रारंभिक बाबी : सदर मतपुस्तिकांमध्ये प्रारंभिक बाबींमध्ये प्रस्तावना , कायदेशिर तरतुदी , मतदान पथक , मतदानाशी संबंधित प्रशिक्षणे , टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज , मतदान साहित्य , ईव्हीएम व व्हिव्हीपॅट तपासणी , मतदान साहित्याची तपासणी , छायाचित्र मतदान याद्या , एकेरी निवडणूकीसाठी मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये , एकत्रित निवडणूकीसाठी मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये , मतदान केंद्राध्याची कर्तव्ये , मतदान समाप्त करणे , क्षेत्र अधिकारी , मतदान सहायता केंद्र या बाबीविषयक माहिती देण्यात आलेली आहे .
मतदान केंद्राची रचना आणि सुरक्षा व्यवस्था मध्ये मतदान केंद्रावर येणे , मतदान अधिकाऱ्याची अनुपस्थिती , एकेरी निवडणूकीसाठी मतदान केंद्राची रचना , एकत्रित निवडणुकीसाठी मतदान केंद्राची रचना , एकत्रित घेतल्या जाणाऱ्या निवडणूकांसाठी मतदान प्रक्रिया , इतर सावधगिरी , नोटीसा लावणे , मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती , मतदान प्रतिनिधी नियुक्ती करणे आणि नियुक्ती रद्द करणे , मतदान प्रतिनिधींनी नियुक्तीपत्रे सादर करणे , मतदान प्रतिनिधींची उपस्थिती , मतदान प्रतिनिधींसाठी प्रवेशपत्रे , मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था , मतदान केंद्रात धूम्रपान करण्यास मनाई करणे , मतदान केंद्रावरील वृत्तपत्र प्रतिनिधी , छायाचित्रकार व व्हिडीओग्राफर यांना द्यावयाच्या सुविधा इ. बाबींचा समावेश आहे .
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हीपॅट संच मांडणी करणे व तयारी करणे यांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यांची ओळख , इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र , मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी , अभिरुप मतदानापुर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हीपॅटची संच मांडणी करणे आणि अभिरुप मतदान घेणे , अभिरुप मतदानापुर्वी मतदान युनिट , नियंत्रण युनिट व व्हिव्हीपॅट यांची जोडणे करणे , अभिरुप मतदान घेणे , अभिरुप मतदान समाप्त झाल्याच्या नंतर आणि प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यापुर्वी नियंत्रण युनिट व व्हीव्हीपॅट मोहोर बंद करणे , नियंत्रण युनिटचा निकाल विभाग हिरवी कागदी मोहोर , विशेष खूणाचिट्ठी आणि पत्ता खूणचिट्ठी इ . बाबींचा समावेश आहे .
मतदान कार्यपद्धती : मतदान केंद्रामध्ये व त्याच्या सभोवताली निवडणुक कायद्याची अंमलबजावणी , मतदानास प्रारंभ करणे , मतदारांची ओळख पटविणे आणि त्यासंबंधात आक्षेप घेण्याच्या बाबतीतील कार्यपद्धती , मतदाराची ओळख पटविणे , ज्यांना टपाली मतपत्रिका देण्यात आल्या आहेत असे अनुपस्थित मतदार , मयत अनुपस्थित आणि तोतया मतदारांची यादी , मतदार यादीमधील लेखन आणि छपाईच्या चूका दुर्लक्षित करणे , मतदाराला त्याचे / तिचे मत नोंदविण्यासाठी त्याला / तिला परवानगी देण्यापुर्वी पक्क्या शाईची खुण करणे आणि सही / अंगठ्याचा ठसा घेणे , मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीची तपासणी करणे व पक्क्या शाईची खूण करणे , नविन मतदानाच्या वेळी शाई लावणे / प्रत्यादेशित मतदान , मतदाराला नोंदवही मतदार अनुक्रमांकाची नोंद करणे , मतदाराच्या सहीची व्याख्या , मतदाराच्या अंगठ्याचा ठसा घेणे इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील सविस्तर पुस्तिका पुढीप्रमाणे पाहु शकता ..
या संदर्भात निवडणूक आयोगांकडून प्रसिद्ध करण्यात आलेले माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
सविस्तर पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी CLICK HERE