पुढील 48 तासात राज्यात पावसाचे मोठे संकट ; हवामान विभागाचे हायअलर्ट , या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ IMD Monsoon forecast new update for next 48 hours ] : राज्यांमध्ये पुढील 48 तासात मोठे संकट ओढावणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . पाऊस आता शेवटच्या स्टेज वर असून , पावसाची तिव्रता अधिक आहे . यामुळे पुढील 48 तासांमध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

पुणे , मावळे , भोर , वेल्हा , मावळ , मुळशी , खडकवासला , पिंपरी चिंचवड भागांमध्ये कालपासुन अतिमुसळधार पाऊस पडत असून सदर भागांमध्ये भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये ,अजुन अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने , सदरच्या भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

याशिवाय कोकण किनारपट्टीवर जिल्हे , मराठवाडा मधील लातुर , धाराशीव , परभणी , नांदेड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . कोकणांमध्ये नद्यांना पुर येण्याचे प्रमाणे वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत .

समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता : कोकणांमध्ये अतिमुसळधार पाऊस होत असल्याने , समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . यामुळे मुंबईच्या किनारी भागातील रस्त्यावर पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहेत . मुंबईला पुढील 48  तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .

या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर : राज्यातील रायगड , पुणे , सातारा , सांगली या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने , सदर जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालयांना आज दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

तसेच मुंबई पालिक हद्दीमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने , सर्व माध्यमांच्या शाळा – महाविद्यालये यांना आज दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . तसेच गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ज्या भागात पुरस्थिती निर्माण झालेली आहे , अशा भागांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

Leave a Comment