Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ If any employee is found in the bar on December 31, legal action will be taken. ] : दिनांक 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यात येते . यांमध्ये मद्यमान मोठ्या प्रमाणात केले जाते . तर 31 डिसेंबरची पार्टी करताना जर कर्मचारी बार मध्ये आढळल्यास त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये प्रामुख्याने शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी हे नियम लावण्यात आले आहेत . कारण शिक्षक हा समाजातील आदर्श घटक आहे . विद्यार्थी बरोबरच समाजांमध्ये संस्काराचे धडे देणारा मनुष्य असल्याने , शिक्षकांकडून वाईट कृत्य घडून होवू नयेत , यासाठी अश्या प्रकारचे निर्देश प्रशासनांकडून देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नाशिक जिल्ह्यात महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी पाटील व कळवण प्रांताचे प्रांताधिकारी यांना याबाबत आदेश जारी केले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , जर शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी 31 डिसेंबरला बारमध्ये पार्टी करताना आढळून आल्यास ,त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले आहे .
या आदेशाचे नागरिकांकडुन स्वागत करण्यात येत आहेत . तसेच शालेय आवारात शिक्षकांकडून जर तंबाखू खाताना आढळून आल्यास , त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल , असे आदेशात नमुद करण्यात आले आहेत . तर शिक्षक हा समाजातील महत्वपुर्ण घटक असून , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी हे निर्व्यसनी असायला हवेत , असे नमुद करण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.