लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : भारतांमध्ये कमी किंमतीमध्ये जास्त मायलेज व जास्त फिचर्स देणारी कारला सर्वात मोठी मागणी असते . Hyundai Exter ही भारतांमध्ये सर्वात जास्त विकली ( Sales ) होणारी पहीली कार ठरली आहे . Hyundai कंपनीने टाटा पंचच्या विरोधात लाँच केली होती , आता ही कार टाटा पंचला मागे टाकत आहे . यांमध्ये टाटा पंचपेक्षा अधिक फिचर्स देण्यात आलेले आहेत .
टाटा पंच व Hyundai Exter मध्ये समान किंमत असूनही टाटा पंच केवळ बेसिक फिचर्स उपलब्ध करतो , तर Hyundai Exter अनेक फिचर्स सह लाँच करण्यात आल्याने , देशांमध्ये सर्वात सेल होणारी कार ठरली आहे . Hyundai कंपनीकडून आता एसयुव्ही कार लाँच करण्यात आल्याने , Hyundai Exter च्या मागणींमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे , या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने , Hyundai Exter ही कार कंपनीकडून सीएनजी मध्ये देखिल लाँच करण्यात आलेली आहे .CNG लाँच केल्यापासून Hyundai Exter च्या एका महिन्यांमध्ये तब्बल 50 हजार पेक्षा अधिक बुकिंग झालेल्या आहेत .
Hyundai Exter ही ह्यंदाई ची मायक्रो एसयुव्ही कार सध्या टाटा पंच , रेनॉल्ड किगर , सेट्रॉन सी -3 मारुती फ्रोन्स या कारशी स्पर्धा करीत आहे . Hyundai Exter खास वैशिष्ट्ये पाहिले तर ही कार कमी किंमतीमध्ये अधिक चांगले फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
खास फिचर्स : यांमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन , तसेच क्रुझ कंट्रोल सिस्टम , वायरलेस चार्जिंग व ड्रायव्हर डिस्प्ले , ऑटो एसी , सिंगल पेन सनरुफ , डॅश कॅम , ड्युअल कॅमेरा अशी खास फिचर्स देण्यात आलेले आहेत .तसेच यांमध्ये सहा एअरबॅग तसेच इलेक्ट्रानिक स्थिरता नियंत्रण उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .ही कार S , SX , EX, SX , SX ( Connect ) अशा प्रकारच्या पाच व्हेरियंट मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
Hyundai Exter मायलेज : यांमध्ये 1.2 लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 19.4kmpl , 1.2 लिटर पेट्रोल AMT व्हेरिएंट मध्ये 19.2 kmpl मायलेज तर 1.2 लिटर पेट्रोल CNG मध्ये 27.1 Kmpl मायलेज देते .
किंमत : ह्युंदाईच्या नविन लॉन्च केलेल्य Hyundai Exter ची सर्वात जास्त लोकप्रियता असून , या कारची एक्स शोरुम किंमत ही 6 लाख रुपयांपासून सरुवात होते , तर यांमधील टॉप मॉडेलची एक्स शोरुम किंमत ही 10.10 लाख रुपये अशी आहे . यांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल , टायर प्रेशर मॉनिटरिंग सुविधाा तसेच रिअर पार्किंग कॅमेरा देण्यात आलेले आहेत .