Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Home Loan Update] :- प्रत्येक नागरिकाचे हेच स्वप्न असते की, आपले स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे. परंतु आपण सध्याच्या महागाईचा विचार केला तर अशावेळी घर बांधण्यासाठी जी काही लागणारी आवश्यक सामग्री आहे. त्याचे दर अगदी प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे घर बांधण्याचे काम हे खूपच खर्चिक झाले आहे. अशावेळी स्वतःची जागा नसेल तर जागा खरेदी करायची झाल्यास जागेचे सुद्धा भाव तितकेच वाढले आहेत. त्यामुळे जागा खरेदी करून स्वतःचे हक्काचे घर त्याच जागेवर बांधायचे असेल तर अशावेळी आपल्याकडे मोठे बजेट असणे गरजेचे आहे.
स्वतःच्या हक्काचे घर पूर्ण करण्यासाठी कित्येक नागरिक गृह कर्जाचा आधार घेताना दिसत आहेत. त्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतात आणि अशा प्रकारे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करतात. परंतु बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेत असताना कोणत्या बँकेच्या कर्जावरील व्याजदर कमी जास्त आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे (Home Loan interest rate). जर व्याजदर गगनाला पोहोचत असतील तर अशावेळी नक्कीच आपल्याला आर्थिक अडचणी येऊ शकते. त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्यात तितकेच गरजेचे आहे.
अशा परिस्थितीचा विचार करत असताना कित्येक नागरिक गृह कर्जाच्या व्याजदरबाबत अगदी तत्परतेने माहिती जाणून घेतात. तसेच गृह कर्ज कोणत्या बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून घेणे आपल्या फायद्याचे ठरेल. याची माहिती उपलब्ध करून घेतात (Home Loan subsidy). तर आज आपण आजच्या लेखामध्ये कमीत कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज कोणकोणत्या बँका देत आहेत? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
1) युनियन बँक ऑफ इंडिया – 30 लाख रुपयांच्या गृह कर्जावर एकूण 20 वर्षाच्या कालावधीसाठी सर्वात कमी व्याजदर करणाऱ्या विविध बँकांचा विचार केला तर त्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया ही एक महत्वपूर्ण बँक आहे. ग्राहकांना होम लोन ही बँक म्हणजेच गृहकर्जावर कमीत कमी 8.40% ते जास्तीत जास्त 10.80% इतके व्याजदर आकारत आहे (Home Loan tax benefit). जर आपण प्रोसेसिंग फी चा विचार केला तर एकूण अर्ज रकमेच्या झिरो 0.50% इतकी रक्कम घेतली जाण्याची शक्यता आहे.
2) बँक ऑफ बडोदा – मित्रांनो बँक ऑफ बडोदा सुद्धा एक महत्त्वाची अग्रगण्य बँक असून या बँकेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही 30 लाख रुपयांचे होम लोन घेतले असेल तर याच होम लोन वर 8.40% पासून 10.60% इतके व्याजदर आकारले जात आहे. 0.50% इतकी प्रक्रिया शुल्क या ठिकाणी बँक आकरत आहे.
3) इंडियन बँक – तुम्हाला जर होम लोन घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही अशावेळी इंडियन बँकेचा अगदी बिनधास्तपणे विचार करू शकता. गृहकर्जावर इंडियन बँक ग्राहकांना व्याजदर कमीत कमी 8.45% ते जास्तीत जास्त 10.20% इतके देत आहे (Home Loan interest calculator). या बँकेच्या माध्यमातून एकूण खर्च जवळपास 0.25% पर्यंत प्रोसेसिंग फी त्या ठिकाणी आकारली जाते.
4) आयडीबीआय बँक – ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण बँक असून या बँकेच्या माध्यमातून गृह कर्ज उपलब्ध करून घेतल्यास नक्कीच आपल्याला परवडू शकते. आयडीबीआय बँक सुद्धा याच गृह कर्जावर 8.45% ते 12.25% इतका व्याजदर आकारत आहे. आयडीबीआय बँक अंतर्गत एकूण कर्ज रकमेचा जो काही प्रक्रिया शुल्क असेल तो पाच हजार रुपयांपासून दहा हजार रुपये पर्यंत असेल.
5) युको बँक – गृह कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी ही बँक सुद्धा अत्यंत फायद्याची ठरत असून, तुम्हाला 20 वर्षाच्या कालावधीसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून घ्यायचे असेल तर त्यावर 8.5% इतका व्याजदर आकारला जात आहे. यासोबतच कर्जाच्या रकमेवर जी काही प्रक्रिया शुल्क असेल ते भरण्यासाठी पंधराशे पासून पंधरा हजार रुपये रक्कम आकारली जाते.
तर अशाप्रकारे तुम्ही वरील कोणत्याही बँकांच्या माध्यमातून गृह कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. अत्यंत कमी व्याजदर उपलब्ध करून घेतलेल्या कर्जावर ह्या बँका आकारत आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व चांगली बचत या बँकांच्या कर्ज सुविधेतून करता येईल.