Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Holi & Dhulivandan Festival Importance & Histroy ] : देशांमध्ये हिंदु संस्कृतीत होळी व धुलिवंदन हे सण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत असतात . या दोन्ही सणांचे महत्व व इतिहास पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

होळी सणाचे महत्व : देशांमध्ये एकाच दिवशी होळी सण साजरी करण्यात येत असते , याचे मुख्य उद्देश म्हणजे आपले वाईट विचार तसेच दृष्ट प्रकृती यांचा होळीमध्ये दहन करणे . होळी दहनानंतर वातावरण हे शुद्ध होते असे हिंदु संस्कतीमध्ये धारण आहे . होळी या सणाला राज्यात शिमगा असे संबोधले जाते तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कामदहन तर पश्चिम बंगाल मध्ये दौलयात्रा तर उत्तरेकडील राज्यांमध्ये दोलायात्रा असे संबोधले जाते . या दिवशी बोंब मारुन होळी पेटविली जाते .

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन सण साजरा केला जातो , या दिवशी काही राज्यांमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते तर आपल्या राज्यात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते . या काळांमध्ये उन्हाचे प्रमाण अधिक असल्याने , उन्हांचे दाह कमी व्हावेत याकरीता रंगपंचमी साजरी करण्यात येत असते .

या मागच्या आख्यायिका : भारतीय पुराणिक कथानुसार सांगितले जाते कि , हिरण्य कश्यपू हा देत्याचा मुलगा हा प्रल्हाद जो कि नारायणाचा भक्त होता , जे कि दैत्य हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नव्हेत , त्यामुळे त्याने आपल्या मुलाला मारायचे ठरविले , त्यासाठी हिरण्यकश्यपू ने आपल्या बहिणीला पाठविले . जे कि तिले नाव होलिका असे होते ती देखिल हिरण्यकश्यपू सारखी अत्यंत क्रुर होती तिने प्रल्हादला मारण्याकरीता एक अग्निकुंड तयार केले , त्यामध्ये प्रल्हादला भस्म करायचे होते , परंतु त्या अग्नीकुंडात तिच भस्म झाली , त्यानंतर होलिका दहन या सणााची सुरुवात झाली अशी आख्यायिका आहे .

दूसरी आख्यायिका : पौराणिक कथेनुसार भगवान शंकर तपश्चर्या करत असताना , ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंत : करणात प्रवेश केला , ज्यामुळे भगवान शंकराने आपले डोळे उघडले त्यावेळी त्यांना मदनाला पाहून त्यांनी त्याला त्याच क्षणी भस्म केले म्हणूनच दक्षिणकडील राज्यांमध्ये लोक कामदेव दहन करतात , तिथे मदनाची प्रतिकृती तयार करुन त्याचे दहन या दिवशी केले जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *