HMPV : राज्यात HMPV चे 2 रुग्ण आढळले ; पुन्हा लॉकडाऊनचे संकेत !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ hmpc virus update ] : HMPV या साथीच्या रोगाचा आपल्या देशांमध्ये देखिल शिरकाव झाला आहे . यामुळे देशात / राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागु होण्याची स्थिती निर्माण होत आहे .

HMPV या साथीचा फैलाव देखिल कोरोना प्रमाणे चीन देशातुनच झाला आहे . हा व्हायरस कोरोना प्रमाणे अधिक धोकादायक नसला तरी सर्वांनी याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे . प्राप्त माहितीनुसार हा व्हायरस लहान वय असणाऱ्या बालकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे .

कोरोना हा आजार लहान मुलांवर परिणाम करत नव्हता , परंतु हा HMPV व्हायरस लहान मुलांवर अधिक परिणाम दर्शवित आहे . HMPV व्हायरसचे रुग्ण देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . देशात कर्नाटक राज्यात 02 रुग्ण आढळून आले आहेत , तर महाराष्ट्र नागपुर जिल्ह्यात 02 रुग्ण आढळून आलेले आहेत .

HMPV चे लक्षणे : HMPV च्या लक्षणांमध्ये ताप , खोकला , सर्दी , घसा खवखवणे , श्वास घेण्यास अडचणी येणे , प्रथमत : हे लक्षणे सामान्य व्हायरल संसर्गाप्रमाणे वाटतात , परंतु गंभीर प्रकरणांमध्ये ब्राँकायटिस व न्युमोनिया प्रमाणे धोका होवू शकतो ..  

अशी घ्यावी काळजी : जेंव्हा खोकला अथवा शिंका येत असतील तेंव्हा नाक , तोंड टिश्यू पेपरने झाका , तसेच साबण , पाणी अथवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझने आपले हात वारंवार धुवणे , तसेच ताप , खोकला व शिंका येत असल्यास , सार्वजनिक ठिकाणांपासून दुर रहाणे , तर भरपुर पाणी व पौष्टीक अन्न खाणे ..

Leave a Comment