Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे , या संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांकडून अर्ज मागविण्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे .

ईपीएफओने कडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की उच्च निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी यापुर्वी आवेदन मागविण्यात आलेले होते , परंतु काही कर्मचारी अर्ज सादर करु शकले नाहीत याकरीता पुन्हा एकदा उच्च निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे .उच्च निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज हा दि.26 जुन 2023 पर्यंत EPFO च्या अधिकृत्त पोर्टलवर आवेदन सादर करायचा आहे .

उच्च निवृत्तीवेतनासाठी अर्ज सादर करण्यासाठी प्रथम EPFO च्या पोर्टवर जावून PENSION ON HIGHER SALARY वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय दिसतील .यामध्ये दि.01 सप्टेंबर 2014 पुर्वी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी या पर्यायावर क्लिक करावेत .शिवाय जर तुम्ही अजुनही नोकरी करत असाल तर दुसऱ्या पर्यायावर क्लिक करावेत . ज्यांमध्ये आपल्याला आपले नाव , जन्मतारीख , मोबाईल नंबर माहीती भरुन सबमिट करावे लागतील .

हे पण वाचा : Breaking News : महाराष्ट्रात 23 जूनला भारत छोडो यात्रा धडकणार , लाखो राज्य कर्मचाऱ्यांची राहणार उपस्थिती !

EPFO कडून दि.22 ऑगस्ट 2014 निवृत्ती मर्यादा सुधारणा करण्यात आलेली असून यापुर्वीची मर्यादा ही 6,500/- रुपये होती तर आता ही मर्यादा 15,000/- अशी करण्यात आलेली आहे .जे कि कर्मचाऱ्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के निश्चित करण्यात आलेली आहे .यानुसार EPFO मध्ये योगदान देणारे कर्मचाऱ्यांना उच्च मर्यादानुसार पेन्शन लाभ घेण्यासाठी दि.26 जुन पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *