Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ High Court issues important order to government regarding implementation of Ladki Bahin Yojana ] : लाडकी बहीण योजनाच्या अंमलबजावणी बाबत , उच्च न्यायालयांकडून , सरकारला महत्वपुर्ण आदेश देण्यात आले आहेत .
उच्च न्यायालयांकडून लाडकी बहीण योजना संदर्भातील जनहित याचिका निकाली काढताना राज्य सरकारला काही महत्वपुर्ण आदेश गुरुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान देण्यात आले आहेत . यावेळी उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले कि , सदर लाडकी बहीण योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी करीता , सरकार कडून आवश्यक असणारे सर्व प्रयत्न करण्यात यावेत .
तसेच सदर योजनांमध्ये सुधारणा करण्याचे देखिल निर्देश देण्यात आले आहेत . सदर लाडकी बहीण योजना माहे जुन 2024 पासुन सरुवात करण्यात आलेली आहे . यांमध्ये 02 वेळा सुधारण करण्यात आले आहे , परंतु अशा सुधारणा करुनही अनेक पात्र महिलांना आवेदन करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला .
या अडचणीमुळेच अनेक महिला सदर योजनांपासुन वंचित आहेत . या संदर्भात प्रमेय वेल्फेअर फाउंडेशनेच वकील सुमेधा राव यांच्यामार्फत सदर जनहित याचिका काढण्यात उपस्थित करण्यात आली होती .
नव्याने अर्ज : सदर योजना अंतर्गत ज्या महिलांना अद्याप आवेदन सादर करता आले नाहीत , अशांना परत अर्ज सादर करता येणार आहेत , तर त्यांना माहे जुन 2024 पासुन एक रक्कमी सर्व हप्ते दिले जाणार आहेत .