Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ High Court Instructions About Farmer Suicides ] : शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न अद्याप पर्यत सरकारकडून मार्गी लागत नाहीत , तर अवर्षण / अतिपाऊस यामुळे शेतीपिकांचे नुकसान तसेच शेतमालाला योग्य भाव नसल्याने , शेतकरी आत्महत्या सारखे प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतो .
देशांमध्ये अन्नधान्य वाढीसाठी हरीत क्रांती होवून देखिल मराठवाडा तसेच विदर्भांमध्ये शेतीपिकांचे उत्पादन पाणी अभावी वाढत नाहीत . या भागांमध्ये कायम दुष्काळच पडतो , यावर सरकारकडून अद्याप पर्यंत ठोस उपाय योजना करण्यात आलेले नाहीत , यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराश्याच येते . विदर्भ व मराठवाडा मध्ये सोयाबिन उत्पादनाचे प्रमाण अधिक आहेत , सध्या सोयाबीनचे भाव पाहिले तर 4300/- ते 4500/- इतका प्रति क्विंटल आहे . जे कि शेतकऱ्यांना परवडतच नाही , कारण पेरणी , काढणी , खत , फवारणी यांचा विचार करता खर्चच अधिक होईल .
शेतमालाच्या भाव संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर तयार करण्यात आलेला अहवाल न्यायालयांमध्ये सादर करण्यात आलेला आहे , सदर अहवालांमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्या कारणांने शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढत आहेत . सदर अहवालाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव , तसेच RBI , ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी संभाजीनगर , अमरावती व नागपूर विभागीय आयुक्त यांना दिनांक 16 जुन पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे , उच्च न्यायालयांमध्ये एका जनहित याचिकेवर न्यायमुर्ती देवंद्रकुमार उपाध्याय व न्या.अरुण पेडणेकर निकाल देताना , राज्य सरकारला नोटीस बजाविण्यात आलेली आहे . सदर आदेशांमध्ये राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आलेली आहे , शिवाय आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत , याबाबत देखिल माहिती मागविण्यात आलेली आहे .
यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना आधार द्यायला असेल , तर सोयाबीन पिकास हमीभाव व अनुदान देण्याची आवश्यक आहेत . जेणेकरुन शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होतील .