Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Heatwave Warning Rain Update News ] : येत्या तीन दिवसांमध्ये विजेच्या कडकडांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा मोठा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे . या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस तसेच वादळ येण्याची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , येत्या 2 दिवसांमध्ये पुर्व तसेच द्विपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये मौठ्या प्रमाणात उष्णतेची लाट येण्याची मोठी शक्यता आहे , तर दिनांक 09 एप्रिल 20214 पर्यंत जोराचा पाऊस तसेच वादळ आणि वाऱ्यांसह येण्याची शक्यता आहेत . तसेच शक्रवारी आणि शनिवारी पश्चिम बंगाल , ओडिशा , विदर्भ , कर्नाटक , आंध्र प्रदेश , झारखंड तसेच रायलसीमा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

तर मेघालय , नागालँड त्रिपुरा , मणिपुर , अरुणचल प्रदेश , ओडिशा आणि पश्चिम बंगाल , तयेच तामिळनाडू , पद्दुचेरी ,केरळ आसाम , मेघालय या भागांमध्ये देखिल प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे .

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रवात स्थितीमुळे अरबी समुद्रावरुन गुजरात राज्याकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहेत , परिणामी मुंबईसह ठाणे , पालघर तसेच रायगडच्या किनारपट्टीवर तापमानात झपाट्याने वाढ झालेली आहे . यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान चाळीशी पार गेलेले आहेत , त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामाना करावा लागत आहे , दुसरीकडे भारतातील ईशान्य भागांमधील काही राज्यांत उष्णतेची मोठी प्रमाणात लाटा येण्याच शक्यता हवामान खात्यांकउून वर्तविण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *