Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ hdfc bank parivatrans ecss programme ] : एचडीएफसी बँक परिवर्तन शिष्यवृत्ती योजना अंतर्गत इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 75,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्तीची तरतुद आहे .
सदर योजनांच्या माध्यमातुन गरीब विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती मधून लाभ दिला जातो . तर इयत्तानुसार व अभ्यासक्रमानुसार सदर योजनांच्या माध्यमातुन शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते . याकरीता पात्रता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
- विद्यार्थी हा इ. 1 ली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेत असावा .
- सदर विद्यार्थ्याचे कुटंबाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावेत .
- विद्यार्थी हा भारतीय असावा .
- विद्यार्थ्यांने मागील इयत्ता / पात्रता परीक्षा मध्ये 55 टक्के गुण घेवून उत्तीर्ण असावा .
इयत्ता / शैक्षणिक अर्हतानुसार शिष्यवृत्ती रक्कम :
अ.क्र | इयत्ता | शिष्यवृत्ती रक्कम |
01 | 1 ली ते 6 वी | 15,000/- |
02 | 7 वी ते 12 वी , डिप्लोमा , आयटीआय | 18,000/- |
03 | पदवी | सामान्य पदवी 30,000/- व्यावसायिक पदवी -50,000/- |
04 | पदव्युत्तर पदवी | सामान्य पदव्युत्तर पदवी 35,000/- व्यावसायिक पदव्युत्तर पदवी – 75,000/- |
अर्ज प्रक्रिया : सदर योजना अंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी buddy4study.com या संकेतस्थळावर HDFC बँक परीवर्तन ECSS कार्यक्रम 2024-25 यावर क्लिक करावेत .सदर शिष्यवृत्ती अंतर्गत आवेदन सादर करण्यासाठी शेवटची मुदत ही 30.10.2024 अशी आहे .