एचडीएफसी बँक मार्फत सन 2023-24 करीता इयत्ता 1 ली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी विहीत मुदत मध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक पात्रता , शिष्यवृत्ती रक्कम , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आवश्यक पात्रता : यांमध्ये उमेदवार हे पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच इयत्ता 01 ली ते 12 वी ( डिप्लोमा / आयटीआय अभ्यासक्रमांचा समावेश ) मध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत . तसेच विद्यार्थ्यांने मागील शैक्षणिक अभ्यासक्रम / इयत्तेमध्ये 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक असणार आहेत .
त्याचबरोबर उमेदाराच्या पालकाचे मागील वर्षाचे उत्पन्न हे 2,50,000/- लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत .
शिष्यवृत्ती रक्कम : शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार अनुज्ञेय असणार आहे . इयत्ता / अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढील तक्त्याप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | इयत्ता / अभ्यासक्रम | शिष्यवृत्ती रक्कम |
01. | पदव्युत्तर पदवी ( जनरल ) | 35,000/- |
02. | पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल ) | 75,000/- |
03. | पदवी ( जनरल ) | 30,000/- |
04. | पदवी ( प्रोफेशनल ) | 50,000/- |
05. | आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा | 18,000/- |
06. | इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यंत | 18,000/- |
07. | इयत्ता 1 ली ते 6 वी पर्यंत | 15,000/- |
आवश्यक कागतपत्रे : सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक , आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालु वर्षाचे ( सन 2023-24 चे ) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती , उत्पनाचा दाखला इ.
अर्ज प्रक्रिया : पात्र विद्यार्थ्यांनी खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
सविस्तर माहितीसाठी / ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !