Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Havaman Andaj ] : पुढील तीन महीन्यांत राज्यासमोर मोठी समस्या येणार आहे , ती म्हणजे उन्हाचे सर्वाधिक प्रमाण पुढील 3 महीन्यात असणार आहेत .

देशात तीव्र उष्णतेची लाट पसरलेली आहे , यामुळे अनेक भागांत सकाळी 10 नंतरच बाहेर जाणे अनेकजन टाळत आहेत , कारण उष्माघाताचे प्रमाण अधिकच वाढले आहेत . उन्हांचे प्रमाण पुढील 03 महिन्यांत अधिकच वाढणार असल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे .  या काळात सर्वांनी काळजी घेणेबाबत मार्गदर्शक सुचना आरोग्य विभागांकडून जारी करणयत आलेले आहेत .

सध्या देशात लोकसभा निवडणूकेचे वारे सुरु असून , यांमध्ये अनेक राज्यात उन्हाचे प्रमाणे अधिकच वाढले आहेत , ते दिवसेंदिवस वाढत चालल्याने उन्हाचे मोठे संकट देशासमोर आले आहे . पुढील तीन महिन्यांत हे तापमानाचे प्रमाण अधिकच वाढ असल्याचे हवामान खात्याने भाकित केले आहेत .

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार माहे मार्च महिन्यात तापमान हे 36 ते 40 अंश सेल्सिअस इतका होता , तर एप्रिल महिन्यांत तापमान हे 38 ते 42 अंश सेल्सिअस इतका असेल , तर मे महिन्यांत 42 ते 44 अंश सेल्सिअस इतका तापमान असेल , असे भाकित करण्यात आलेले आहेत . तर जुन महिन्यात पावसाचे आगमनामुळे तापमान प्रमाण तात्पुरता कमी होईल , परंतु या महिन्यात देखिल तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असणार असल्याचे माहिती हवामान खात्याने दिली आहे .

या काळांमध्ये वयोवृद्ध तसेच लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असणार आहेत , कारण उन्हाचे प्रचंड लाटेमुळे उष्माघातांचे प्रमाणे अधिकच वाढले आहेत , यासाठी शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी सतत पाणी पीणे फायदेशिर ठरेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *