Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजुन देखिल थंडीची हुडहुडी कायम असतानाच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे . कारण काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळ्यास सुरुवात झालेली आहे . यामुळे बाष्पीभवनांमुळे अवकाळी पावसाची मोठी शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे .
राज्यातील विदर्भ व मराठवाड्यांमध्ये पावसाळा ऋतुमध्ये पाऊस कमी पडतो , अवकाळी पाऊस उन्हाळा ऋतु अधिक पडतो , हे पाऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो , यामुळे या अवकाळी पावसाळामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसान अधिक होते . हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा व विदर्भातील एकुण 15 जिल्ह्यांमध्ये गारपीठासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
यांमध्ये मराठवाड्यातील नांदेड , हिंगोली , परभणी , जालना या चार जिल्ह्यांसह विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यांमध्ये पुढील येत्या 29 फेब्रुवारी पर्यंत गारपीठांसह अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , यामुळे सदर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेती कामे आपटुन घेण्याचे इशारा देण्यात आले आहेत .
तर पुढील दोन दिवस राज्यातील जळगाव , नंदुरबार तसेच धुळे या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर नगर , नाशिक आणि सातारा , सांगली , कोल्हापुर , सोलापुर , पुणे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरुपात पावसाची शक्यता असल्याचे अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तविण्यात आला आहे .