Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सध्या राज्यात थंडीची लाट नुकतीच संपली आहे , तर उन्हाळा ऋतुने हजेरी लावली आहे . विदर्भचा विचार केला असता माहे डिसेंबर महिन्यांपासूनच कडक उन्हाळास सुरुवात झालेली आहे . यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होवून , काही ठिकाणी अवकाळी पाऊसाची शक्यता हवामान खात्याने अंदाज दर्शविला आहे .

देशांमध्ये पंजाब , हरीयाणा , चंदीगड , दिल्ली , हिमाचल प्रदेश मध्ये थंडीची मोठी लाट सध्या दिसून येत आहे . सध्या राज्यांमध्ये दिनांक 09 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये संपुर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यात ढगाळ वातारण होईल , त्यासह काही ठिकाणी विजेच्या गडगडाटसी पावसाची मोठी शक्यता असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे . यांमध्ये विदर्भातील विशेषत : भंडारा , वर्धा , वाशिम , यवतमाळ व नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये दिनांक 10 फेब्रुवारी ते दिनांक 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पावसाची अधिक शक्यता असल्याचे अंदाज सांगण्यात आला आहे .

मराठवाडा : मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये दिनांक 09 ते 12 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील , तर काही तुरळक ठिकाणची किरकोळ स्वरुपातील पावसाची शक्यता आहे . तर मराठवाड्यांमध्ये नांदेड , परभणी , हिंगाली या जिल्ह्यांमध्ये पावसाची अधिक शक्यता असल्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे .

तसेच खान्देश मधील जळगाव , धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे , परंतु वातावरण हे ढगाळ असेल , त्यामुळे वातावरण हे थंड होईल व थंडी वाढण्याची शक्यता आहे . तर कोकण विभागांमध्ये या कालावधीमध्ये पावसाची व ढगाळ वातारणची शक्यता कमी असल्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *