Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update for next 02 days ] : राज्यात पावसाची स्थिती ओसरली असून , पुढील दोन दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात राज्यातील हवामान पुढील प्रमाणे राहील .
राज्यामध्ये मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरणासह राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडला आहे , काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह , मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे . पुढील दोन दिवस राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
आज दि .29 डिसेंबर रोजी राज्यात हवामान ढगाळ राहील , त्यानंतर राज्यात हवामान कोरडे राहील . असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेली अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये चक्राकार वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली असून , महाराष्ट्र राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे .
दिनांक 30 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून राज्यात थंडीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर राज्यातील काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . सोमवारपासून राज्याचे हवामान बदलणार असून कोरडे हवामान व थंडीचे प्रमाण वाढणार आहे , असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.