Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Hariyana , Jammu & Kashmir Vidhansabha Result 2024 ] : काल दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 रोजी हरियाणा , जम्मू आणि काश्मीर राज्याचे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहे , यांमध्ये भाजपाला हरियाणा राज्यात एकतर्फी विजय मिळाला तर , जम्मू आणि कश्मिर मध्ये जम्मू आणि कश्मिर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या ..

अ.क्रपक्ष ( जम्मु & कश्मिर राज्य )विजयी जागा
01.जम्मू & कश्मिर कॉन्फरन्स42
02.भारतीय जनता पार्टी29
03.जम्मू & कश्मिर पीपल्स डेमोक्रेटीक पक्ष03
04.जम्मू & कश्मिर पीपल कॉन्फरन्स01
05.कम्युनिस्ट पाटी ऑफ इंडिया01
06.आम आदमी पार्टी01
07.अपक्ष07
 एकुण90

जम्मू आणि काश्मीर राज्य विधानसभा निवडणूका 2024 चा निकाल : यांमध्ये जम्मू आणि कश्मिर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला 42 जागा मिळाल्या , तर भारतीय जनता पार्टी पक्षाला 29 जागा , इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला 06 जागा , जम्मु आणि कश्मिर पिपल्स डेमोक्रेटीक पक्षाला 03 जागा तर JPC पक्षाला 01 जागा तर CPI पक्षाला 01 तर आम आदमी पक्षाला 01 जागा तर अपक्ष उमेदवार 07 जागेवर निवडून आले आहेत . असे एकुण 90 जागेवर निवडणूक संपन्न झाल्या आहेत .

यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रस पक्षाच्या आघाडीचा विजय झाला असून , यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला हे तब्बल नऊ वर्षानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत . ते यापुर्वी सन 2009 ते 2015 या कालावधी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहेत .

अ.क्रपक्ष ( हरियाणा राज्य )विजयी जागा
01.भारतीय जनता पार्टी48
02.इंडियन नॅशनल काँग्रेस37
03.इंडियन नॅशनल लोक दल02
04.अपक्ष03
 एकुण90

हरियाणा राज्य विधानसभा निवडणूका 2024 चा निकाल : यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 48 जागेवर विजय मिळाला आहे , तर इंडियन नॅशनल काँग्रस पक्षाला 37 जागेवर विजय मिळाला , तर इंडियन नॅशनल लोक दल पक्षाला 02 जागा तर अपक्ष उमेदवार 03 जागेवर निवडून आले आहेत . यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असून , मुख्यमंत्री पदावर नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *