Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Harabhara Rate Update ] : या वर्षी हरभरा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहेत . यामुळे या वर्षीच्या वाढत्या मागणीमुळे भावामध्ये मोठी तेजी येणार आहे . तसेच दिवसेंदिवस भावांमध्ये तेजी दिसून येत आहेत . हरभराच्या हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहेत .
मागील आठवड्यापासून हरभऱ्याच्या सर्वसाधारण भाव हे 5,930/- प्रति क्विंटल एवढा मिळत आहेत . तर आत्तापर्यंत 12 फेब्रुवारी रोजी हरभऱ्याला उच्चांकी दर मिळाला आहे , 12 फेब्रुवारी रोजी अकोला कृषी मार्केट मध्ये 6,250/- रुपये इतका भाव मिळाला आहे . सन 2024-25 करीता हरभऱ्याचे हमीभाव 5,440/- रुपये इतका दर सरकारकडून निश्चित करण्यात आलेला आहे .
उत्तर भारतांमध्ये अवकाळी पाऊस यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटले आहेत , तर महाराष्ट्र राज्यात मराठवाड्यासह विदर्भांमध्ये रब्बी हंगामांमध्ये पावसाचे प्रमाणे कमी झाले असल्याने , तसेच काढणीच्या वेळी अवकाळी पाऊसामुळे हरभराचे देशात उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहेत . यामुळे हरभऱ्याच्या मागणीनुसार , भावामध्ये देखिल दिवसेंदिवस तेजी देत आहेत .
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील कृषी बाजार पेठांमध्ये रब्बी हरभरा काढणीनंतर नविन पिकांची आवक सुरु झालेली आहे , दोन्ही राज्यांत हरभऱ्याला 5,700/- रुपये ते 6,200/- इतका प्रति क्विंटला दरम्यान भाव मिळाला आहे . हे दर सरकारने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा अधिक आहे .
देशात हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे , व्यापाऱ्यांकडे डाळ निर्मितीसाठी हरभऱ्याचा तुटवडा निर्माण होत आहे . यामुळे भावांमध्ये तेजी दिसून येत आहेत .यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हरभऱ्याच्या किंमतीमध्ये आणखीण 200-300 रुपयांची वाढ पाहायला मिळणार आहे .