Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Half Payment Leave ] : राज्य कर्मचाऱ्यांना सेवाकाळात अनेक प्रकारच्या रजा मिळतात , यामध्ये अर्जित , अनर्जित , किरकोळ विशेष अशा प्रकारच्या रजांचा समावेश आहे .यापैकी अर्धवेतनी रजा किती दिवस घेता येते , रजा कालावधीमध्ये वेतन कोणत्या प्रमाणात दिले जाते या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अर्धवेतनी रजा नियमावली : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांस प्रत्येक कॅलेंडर वर्षांमध्ये माहे जानेवारी आणि माहे जुलै महिन्याच्या दि.01 तारखेला प्रत्येकी 10 दिवस या प्रमाणे दोन हत्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येत असते . तसेच ही रजा पुर्ण कॅलेंडर महिन्याला 5 भागुले 3 या ( 5/3 ) या दराने जमा करण्यात येत असते .
कॅलेंडर महिना हा पुर्ण नसेल अशा वेळेस तो महिना सोडावयाचा असतो , तर अकार्य दिनाच्या कालावधीकरीता ही रजा 1 भागुले 18 ( 1/18) या दराने कमी करण्यात येते .तर रजेचे दिवस जर अपुर्णांकांमध्ये येत असल्यास ते जवळच्या दिवसात पुर्णांकित स्वरुपात करण्यात येत असते .
ही रज कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणास्तव घेता येत असते , तर या रजेच्या साठवणूकीवर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही . याकरीता कर्मचाऱ्यांस परिशिष्ट – 5 नमुना – 1 मध्ये विहीत नमुन्यात आवेदन सादर करावयाचा असतो .
रजेच्या काळात असे मिळते वेतन : सदर रजा काळांमध्ये कर्मचारी रजेवर ज्याण्याच्या पुर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन घेत असतो , त्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम वेतन ( यांमध्ये मुळ वेतनाचा समावेश आहे ) तसेच त्यावर आधारीत असणारे इतर भत्ते यांमध्ये महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता , शहर पुरक भत्ता ( हे मागील महिन्यांच्या दराने ) अनुज्ञेय असणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.