Spread the love

Live Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Halad Lagawad Information ] : आपण जर वारंवार एकाच पिकांची लागवड करत असाल , जमिनीची कस व उत्पादन देखिल कमी होत असते . यामुळे वेगळ्या पिकांची लागवड करणे आवश्यक असते . अशाच एका पिकांच्या लागवडीबाबत , या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत .

हे पिक म्हणजे हळद होय , या मसाले वर्गीय पिकांची लागवड राज्यांमध्ये खुप कमी प्रमाणात केली जाते , या पिकांस मोठ्या प्रमाणात मागणी आहे . यामुळे पिकांस बाजारात चांगला भाव मिळतो . जर आपण एकरी उत्पादनाचा विचार केला तर सध्याच्या बाजारभावानुसार , एकरी 4 ते 5 लाख रुपये पर्यंतची कमाई होऊ शकते .

या पिकास आवश्यक हवामान : हळद या पिकांस उगवणीकरीता साधारण पणे 30 ते 35 अंश सेल्सिअस इतके तापमान तर फुटवे फटविण्याकरीता 25 ते 30 अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक आहेत तर कंद वाढीदरम्यान 20 ते 25 अंश सेल्सिअस इतर तापमान तर आवश्यक आहे . यामुळे थंडीच्या वातारणांमध्ये हळदीच्या पानांची वाढ थांबत तर हळदीच्या जमिनीमधील कंदाची वाढ झपाट्याने होते . यामुळे कोरडे व थंड हवामान हळद वाढीसाठी अनूकूल ठरते .

हळद लागवडीचा कालावधी : हळदीच्या लागवडीसाठी साधारण पणे मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात तर जून महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड करणे अधिक लाभदायक ठरते .  

राज्यांमध्ये नांदेड , हिंगोली , परभणी , सातारा , सांगली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते . याशिवाय कोल्हापूर , पूणे , सोलापुर या जिल्ह्यांमध्ये हळदीची लागवड केली जाते .

एकरी होईल 4 ते 5 लाखांचे उत्पादन : साधारण पणे हळदीचे एकरी 100 क्विंटल इतकी आली हळदीचे उत्पादन होते , तर हळद सुकी होवून 30 ते 45 क्विंटल इतकी होईल . जर सध्याचे बाजारभाव पाहिले असता , प्रति क्विंटल 15000/- इतके भाव मिळत आहे . यानुसार प्रति एकरी 4 ते 5 लाख रुपये इतके उत्पन्न होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *