Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Hair Loss problem in buladhana ] : राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये टक्कल व्हायरस मुळे लोकांच्या डोक्यावरचे केस अचानक गळून पडत आहेत . यामुळे त्रयस्त लोकांकडून प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे .
बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यामधील तब्बल 11 गावे सदर आजारांपासुन बाधित ठरले आहेत , यांमध्ये कठोरा , भोनगांव , कालवड , बोंडगांव हे अधिक बाधित झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसले आहेत .
सदर 11 गावातील 100 पेक्षा अधिक लोकांचे केसगळतीने बाधित झाले आहेत , ही केस गळती अचानक होत आहे . यामुळे सदर भागातील वातावरण , पाणी तपासण्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक बाजड यांनी दिले आहेत .
सदर भागातील पाण्याचे नमुने तपासले असता , पाण्यांमध्ये नायट्रेट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत . यामुळेच अचानक केस गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनांकडून व्यक्त करण्यात आला आहे .
बाधित गावांची नावे : कालवड , बोंडगाव , भोनगाव , कठोरा , भोनगाव , हिंगणा वैज , घुई , तरोडा कसबा , पहुरजिरा , निंबी , पहुरजिरा